50000under best budget laptop list ll 50000 आतला एक बेस्ट बजेट लॅपटॉप ची लिस्ट

Covid च्या काळात लोक हे वर्क फ्रॉम करत आहेत. त्यामुळे त्यांचा गॅजेट्स चा पण वापर जास्त झाला आहे वर्क फ्रॉम साठी महत्वाची घोश्ट म्हणजे लॅपटॉप वर च काम असते तसेच तसेच आता शिक्षणही सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन क्लासेस होत आहेत . त्यामुळे नवीन लॅपटॉपची गरज भासत आहे आणि त्याची मागणी सुद्धा वाढलेली आहे . जर तुमचे बजेट 50000 असेल आणि तूम्ही जर लॅपटॉप खरेदी करायचे ठरवले असतील तर तुमच्या साठी 50000 आतले लॅपटॉप बद्दल सांगणार आहे .

यात प्रामुख्याने RedmiBook Pro, Acer Aspire 5 A515 56, Lenovo V15 ADA 82C700KDIH, ASUS VivoBook M515DA EJ512TS आणि MSI Modern 14 B10MW 423IN चा समावेश आहे.

MSI Modern 14 B10MW 423IN

MSI Modern 14 B10MW 423IN लॅपटॉपमध्ये १४ इंच फुल एचडी एलईडी बॅकलिट आयपीएस डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे. तसेच, या लॅपटॉप मध्ये ८ GB रॅम आणि ५१२ GB SSD स्टोरेज आहे. हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. MSI Modern 14 B10MW-423 IN ची सुरुवातीची किंमत ४९,९९० रुपये असून हा लॅपटॉप ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

Acer Aspire 5 A515 56

या Acer Laptop मध्ये १५.६ इंच फुल HD डिस्प्ले आहे. या लॅपटॉप मध्ये ११ वे जनरल इंटेल कोर i5 प्रोसेसर देण्यात आले आहे. लॅपटॉप मध्ये ८GB रॅम आणि १TB हार्ड डिस्क स्टोरेज आहे. लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो आणि त्याच्यासोबत इंटेल आयरीस एक्स ग्राफिक्स देण्यात आले आहेत. लॅपटॉपची सुरुवातीची किंमत ४९,९९० रुपये असून लॅपटॉप ई-कॉमर्स साइट अमेझॉन वर उपलब्ध आहे. अॅमेझॉनवरील लिस्टनुसार, लॅपटॉप १० तासांपर्यंत बॅटरी लाईफ देते.

RedmiBook Pro

यामध्ये १५.६ इंचाचा डिस्प्ले असून ११ जनरल इंटेल कोर i5 प्रोसेसर देण्यात आले आहे. लॅपटॉप ८GB रॅम आणि ५१२ GB SSD स्टोरेजने सुसज्ज हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट विंडोज १० होम ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो आणि त्यासोबत मायक्रोसॉफ्ट ऑफिस पूर्व-स्थापित आहे. RedmiBook Pro ची सुरुवातीची किंमत ४९,९९९ रुपये असून हा लॅपटॉप Mi.com आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवरील सूचीनुसार, लॅपटॉप १० तासांपर्यंत बॅटरी लाईफ देते.

Lenovo V15 ADA 82C700KDIH

यामध्ये १५.६ इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले आहे, जो अँटी-ग्लेअर कोटिंगने झाकलेला आहे. AMD Ryzen 5 3500U प्रोसेसर या लॅपटॉप मध्ये देण्यात आला आहे. लॅपटॉप ८GB रॅम आणि १TB HDD स्टोरेजने सुसज्ज आहे. हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट विंडोज १० होम ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. लेनोवो V15 ADA 82C700 KDIH ची सुरुवातीची किंमत ४९,९९९ रुपये असून हा लॅपटॉप ई-कॉमर्स साइट अमेझॉन वर उपलब्ध आहे.

ASUS VivoBook M515DA EJ512TS

ASUS लॅपटॉप मध्ये १५.६ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून AMD Ryzen 5-3500U प्रोसेसर या लॅपटॉप मध्ये देण्यात आला आहे. या लॅपटॉप मध्ये ८GB रॅम आणि ५१२ GB SSD स्टोरेज आहे. लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट विंडोज १० होम ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो अॅमेझॉनवरील लिस्टिंगनुसार, लॅपटॉपची बॅटरी ५.२ तासांपर्यंत सपोर्ट करते. ASUS VivoBook M515DA EJ512TS ची सुरुवातीची किंमत ४९,९९० रुपये असून लॅपटॉप ई-कॉमर्स साइट अमेझॉन वर उपलब्ध आहे

Leave a Comment