बिग बॉस मराठी सीझन १ माहिती | Big Boss Marathi season 1 details

Big Boss Marathi Season 1 ची संपूर्ण माहिती. बिग बॉस मराठी मध्ये एकूण ९९ एपिसोड्स होते. पहिला एपिसोड १५ एप्रिल २०१८ ला तर शेवटचा एपिसोड २२ जुलै २०१८ ला संपला होता. हे पूर्ण एपिसोड ९८ दिवसांमध्ये पूर्ण झाले.

पहिल्या सीझन मध्ये एकूण १८ लोकांनी भाग घेतला होता. बिग बॉस मराठीचे पहिले बक्षीस २५ लाख रुपये होते. ह्यांचे पूर्ण एपिसोड पुणेच्या लोणावळा येथे शूट झाले. महेश मांजरेकर हे या शो चे होस्ट होते जे Colors Marathi चॅनल वर सुरू होते.

Big Boss Marathi Contestants | बिग बॉस मराठीचे पात्र

 1. भूषण कडू
 2. मेघा धाडे
 3. पुष्कर जोग
 4. राजेश श्रीरंगपूरे
 5. रेशम टिपणीस
 6. साई लोकूर
 7. स्मिता गोंदकर
 8. सुशांत शेलार
 9. विनीत भोंडे
 10. शर्मिष्ठा राऊत
 11. नंदकिशोर चौघुले
 12. उषा नंदकिनी
 13. जुई गडकरी
 14. ऋतुजा धर्माधिकारी
 15. आस्तद काळे
 16. त्यागराज खाडिलकर
 17. अनिल थत्ते
 18. आरती सोलंकी

बिग बॉस मराठी सीझन १ ची controversy

रेषम टिपणीस आणि राजेश श्रीरंगपुरे यांच्यामधे रेलेशनशिप बद्दल कट्रोव्हर्सी झाली होती. तसेच बिग बॉसच्या आठव्या दिवशी खुर्ची सम्राट मध्ये तेथील लोकांमध्ये दोन गट तयार झाले.

बिग बॉस मराठी सीझन १ विजेता

पहिल्या बिग बॉसच्या विजेता मेघा धाडे होत्या. त्यांना २५ लाख रुपयाचे बक्षीस मिळाले होते. तेव्हा दुसऱ्या स्थानावर पुष्कर जोग होते.

मेघा धाडे ह्या भारतीय अभिनेत्री आहे. त्यांच्या पतीचे नाव आदित्य पावसकर आहे. त्यांनी “किस देश में है मेरा दिल” आणि “कस्तुरी” या हिंदी टीव्ही सीरियल मध्ये काम केले आहे. २०१८ मध्ये त्यांनी हिंदी बिग बॉस १२ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री केली होती.

मेघा धाडे फिल्म आणि टेलिव्हिजन सीरियल

Movies

 • मान सन्मान
 • सुपरस्टार
 • मॅटर
 • एक होती राणी

Tv Serial

 • कसौटी जिंदगी की
 • पेहचान
 • कस्तुरी
 • एकदम कडक
 • आज का स्पेशल

पुष्कर जोग हा दुसरा नंबर चा विजेता होता. जर मेघा जिंकली नसती तर हा जिकला असता.

पुष्कर जोग बद्दल माहिती

पुष्करचा जन्म पुणे येथे झाला आणि हा वयाच्या चौथ्या वर्षापासून ॲक्टिंग करत आहे. सोबतच हा एक डेंटिस्ट सुधा आहे. यांनी मराठी फिल्म जबरदस्त मध्ये अभिनय केले आहे.

पुष्कर जोग फिल्म आणि टीव्ही सीरियल

Films

 • हम दोनो
 • आजमाईश
 • डोन्ट वरी बी हॅप्पी
 • वाजवू का
 • सून लाडकी सासरची
 • साखरपुडा
 • रावसाहेब
 • सत्या
 • धूम टू धमाल
 • तुक्या तुकविला नाग्या नाचविला
 • शिखर
 • राजू

Tv serial

 • तू तू मैं मैं
 • हद कर दीं
 • रीन एक दोन तीन
 • वचन दे तू मला
 • महाराष्ट्राचा नच बलिये
 • झुंज मराठमोळी
 • सेलेब्रिटी क्रिकेट लीग
 • बिग बॉस मराठी १
 • सूर नवा ध्यास नवा ३

अशा प्रकारे ही दोन व्यक्ती महाराष्ट्र मध्ये चर्चेला होती. बिग बॉसचे दुसरे सीझन २६ मे २०१९ ला सुरू झाले आणि १ सप्टेंबर २०१९ ला समाप्त झाले. बिग बॉस ३ सध्या कोरोना व्हायरस मुळे पुढे ढकलले गेले आहे.

Leave a Comment