गरीब लोकांनी राजकारणात यावे की नाही?

एका सामान्य व्यक्तीला हा प्रश्न विचारला. तू राजकारणात का बरं आला. त्यावर तो म्हणाला.

तुम्ही UPSC ची परीक्षा द्याल तर पंतप्रधानाचे सल्लागार होणार. MPSC द्याल तर मुख्यमंत्र्याचे सल्लागार होणार. परंतु भारतच्या संविधानाने गरीब व्यक्तीला सुद्धा पंतप्रधान होण्याचा हक्क दिला आहे. मग आपण हिम्मत का बर नाही करावी.

भारतामधे सगळ्यात जास्त पैसे राजकारणात आहे. तो पण बिना टॅक्स नी.

एका खासदारचा पगार लाखो रुपये असतो. त्याला वार्षिक खर्च ५ करोड आणि किरकोळ खर्च १ लाख पर्यंत. त्यामुळे सामान्य माणूस या मोठ्या पदापर्यंत पोहोचणे शक्य नाही. मग राहिला प्रश्न शेतकऱ्याचा, विकासाचा, महागाईचा, आणि बेरोजगारीचा. पण यावर कुणी बोलत नाही.

कारण संसदेत बसणारे लोकं कसे निवडून आले आहे हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे तेरी भी चूप और मेरी भी चूप.

त्यामुळे सामान्य व्यक्ती संसदेत गेला तर काही प्रश्न सुटणार. आता राजू शेट्टी, बचू कडू, सदा भाऊ खोत, नारायण राणे या सारखे सामान्य माणसाला ही पदे मिळाले आहे.

Leave a Comment